कंधार तहसील कार्यालयाच्या इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 31 डिसेंबर रोजी उदघाटन

कंधार: तालुक्यातील तहसील कार्यालयाच्या नवीन इमारतीचे 31 डिसेंबर रोजी उदघाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती कंधार-लोह्याचे आ.प्रताप पाटील चिखलीकरांनी पत्रकार परिषदेत दिली.

कंधार तालुक्यातील तहसील कार्यालयाची ईमारत अत्यन्त जीर्ण झाली होती ही ईमारत पाडून तीन वर्ष लोटले होते. भूमिपूजनसाठी राजकीय वादात सदरील काम रखळले होते. नवीन इमारतीच्या कामाची सुरुवात एक वर्षा पूर्वी करण्यात आली होती या इमारतीसाठी 1 कोटी 94 लाखांचा निधी मंजूर झाला होता. या इमारतीची पाहाण्यासाठी आ.प्रताप पाटील चिखलीकर शनिवार दि.16 रोजी भेट देऊन इमारतीच्या शिल्लक कामे 15 दिवसात पूर्ण करण्याची सूचना गुत्तेदार व कार्यकारी अभियंतास दिली. पुढे बोलताना ते म्हणाले की तहसील कार्यालयचा उदघाटन सोहळ्यास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह ग्राम विकासमंत्री पंकजा मुंडे, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, महसूल राज्यमंत्री संजय राठोड, पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्यासह राज्य मंत्रीमंडळाच्या अनेक मंत्र्यांना निमंत्रन देणार असल्याची माहिती आ.चिखलीकरांनी पत्रकाराना दिली.

यावेळी कार्यकारी अभियंता व्ही.टी बढे, उप विभागीय महसूल अधिकारी प्रभोदय मुळे, जि.प सदस्य प्रवीण पाटील चिखलीकर, नगराध्यक्ष मोहम्मद जफरोद्दीन, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बाबुराव केंद्रे, माजी नगरसेवक कृष्णा पापिनवार, सहाय्यक अभियंता अमित उबाळे, नायब तहसीलदार सुरेश वडवळकर, नगरसेवक सुनील कांबळे, संजय कदम, मधुकर डांगे, गुत्तेदार वैजनाथ सदलापुरे, राजहंस शहापुरे, सुनील सदलापुरे, शेख नवाब, हरी ढवळे, गणेश सावळे, प्रकाश तोटावाड, सय्यद सलीम, निलेश गौर, मोहम्मद काजेमोद्दीन, शेख फारुख, सतीश कांबळे, राजू लाडेकर यांच्यासह कार्यकर्ते व अधीकारी उपस्तिथ होते. - सचिन मोरे

Comments